आमच्याविषयी

महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील महाराष्ट्र व  कर्नाटक राज्याच्या सीमे लगत वेदगंगा नदी काठी वसलेले आमचे गाव म्हणजे भडगाव.

भडगाव ग्रामपंचायत ही सन २१/०३/१९५६  सालापासून कार्यरत असून ९  सदस्य संख्या आहे.

ग्रामपंचायतीस तंटामुक्त गाव पुरस्कार तालूकास्तरीय बालस्नेही व लिंग भाव अनकूल पंचायत पथदर्शी प्रकल्प कागल अंतर्गात्त सन २०२२.२३ उत्कृष्ट बालस्नेही ग्रामपंचायत पुरस्कार तालुका स्तरीय तृतीय क्रमांक व उत्कृष्ट महिला सभा ग्रामपंचायत पुरस्कार तालुका स्तरीय तृतीय क्रमांक तसेच T B मुक्त ग्रामपंचायत २०२३ कोल्हापूर ग्रामीण यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

 , वर्ग हनुमान देव मंदिर ची माहिती

मौजे भडगाव ता. कागल येथील श्री हनुमान देवाच्या पदस्पर्शाने झालेली हि भूमी व येथील परिसर पवित्र व धार्मिक मनाला जातो. सदर देवस्थान हे फार जागृत देवस्थान आहे. सदर मंदिरामध्ये कौलाला फार महत्व आहे प्रत्येक शनिवारी गावच्या रखवालीचा कौल घेतला जातो. त्याच बरोबर भाविक आपल्या कोणत्याही कामाची सुरुवात देवाच्या कौल घेऊन करतात. तसेच सदर मंदिराचे सन व उत्सव मोठ्या प्रमाणात होतात, यामध्ये माही पोर्णिमा /यात्रा, हनुमान जयंती, दसरा हा दहा दिवसाचा सन मोठ्या प्रमाणात भक्तिमय वातावरणात होतो.

या देवाच्या नवरात्र उत्सवा मध्ये हजारो भाविक नवरात्र मध्ये उपवास धरतात त्याच बरोबर सदर मंदिराची यात्रा होते. यात्रेच्या आदला दिवस देवाच्या जागराने साजरा केला जातो. या दिवशी दोन्ही गावातील माहेरवाशीणी देवाच्या खणा- नारळाने ओटी भरतात. रात्री रात्रभर जागर साजरा करतात व देवाकडे नवस मागतात. मंदिर परिसर गर्दीने फुलून जातो. रात्री देवाला गुलाल खोब-याची उधळण करत पालखी मंदिरा भोवती पाच प्रदक्षिणा घालते. सोबत सासनकाठ्या नाचविल्या जातात. मानाचे पाटीलककीचा विधीही पार पडतो. जागर दिवशी हे सर्व कार्यक्रम विधीपूर्वक पार पडतात. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे गावातील बारा बलुतेदार नैवद्यासह देवासमोर हात जोडून उभे असतात. इंगळी कार्यक्रम संपन्न होत असताना दीपमाळेवर अग्निकुंड प्रज्वलित केला जातो. तांबडे फुटण्याच्या वेळेस देवाचे गाऱ्हाणे सुरु होते आणि गावाचे ग्रामस्थ यात्रेच्या मुख्य दिवसाचे स्वगर करत आनंदाने जल गंगा पूजन करून  आप-आपल्या घरी मार्गस्त होतात.

हनुमान देव हा राम भक्त असून  हनुमान हा सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहे, म्हणजे तो अजूनही जिवंत आहे, अशी मान्यता आहे. जगात ज्या ज्या ठिकाणी, जेव्हा जेव्हा रामाचे नाव घेतले जाते, तेथे मारुती हजर असतो, असे म्हणतात. या माहितीच्या आधाराने कवी तुलसीदासाने मारुतीला शोधून काढले. मारुतीचा उल्लेख महाभारतातदेखील येतो.