गावातील विविध सुविधा

गावातील विविध सुविधा :

शैक्षणिक सुविधा :

गावामध्ये १० वी पर्यंत शिक्षणाची सोय आहे.

  • प्राथमिक शाळा – विद्या मंदिर भडगाव,
  • माध्यमिक शाळा – न्यू इंग्लिश स्कूल भडगाव

दुध संस्था :

गावामध्ये कृषीपुरक जोडधंद्यांमध्ये दुग्धउत्पादन हा व्यवसाय असून गावामध्ये दोन दुध संस्था आहेत..

दूध संस्था व त्यांची नावे –

  • श्री.हनुमान सह दुध व्यावसायिक संस्था मर्या भडगाव
  • श्री.कृष्ण सह दुध व्यावसायिक संस्था मर्या भडगाव
  • श्री.माउली सह दुध व्यावसायिक संस्था मर्या भडगाव
  • श्री.महालक्ष्मी सह दुध व्यावसायिक संस्था मर्या भडगाव

महिला बचत गट :

महिलांचा विकास करण्यासाठी गावामध्ये पाच महिला बचत गट निर्माण केले असून त्यांमार्फत महिलांचे आर्थिक, सामाजिक सबलीकरण होत आहे. अनेक कुटुंबांना महिला बचत गटाचा आधार ठरत आहे.

  • तनिष्क स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • भावेश्वेरी स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • दुर्गा स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • जिजामाता स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • लक्ष्मी नृसिंह स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • जय भवानी स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • सखी सावित्री स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • स्वर्गीय मीनाताई ठाकरे स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • जान्हवी स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • शिवाकन्या  स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • स्त्रीशक्ती स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • प्रगती स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • जय शिवराय स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • राधे कृष्ण स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • अनुष्का स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • भाग्य लक्ष्मी स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • सावित्री स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • ताराराणी स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • अन्नपूर्णा स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • हलसिद्धनाथ स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • श्री माउली स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • रिद्धी सिद्धी स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • सखी सायाद्री स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • सिद्धीविनायक स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • जय जिजाऊ स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • श्री विठ्ठल स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • रमाई स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • संत बाळूमामा स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • भाग्य लक्ष्मी स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • श्री समर्थ स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव
  • रणरागिणी स्वंयसहाय्यता महिला समूह भडगाव

तरूण मंडळे :

तरुणांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी उपयोग करुन घेण्यासाठी तरुण मंडळे स्थापन केली आहेत. यांमार्फत विविध सामाजिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा आयोजित केल्या जातात.

मंडलिक युवा प्रतिष्ठान

  • श्री हनुमान तरुण मंडळ
  • श्री शिवशक्ती तरुण मंडळ
  • श्री शिव शंभू तरुण मंडळ
  • श्री अष्टविनायक तरुण मंडळ
  • श्री जय शिवराय तरुण मंडळ
  • तात्या ग्रुप तरुण मंडळ

वित्तिय संस्था :

ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्यासाठी गावामध्ये बलभीम  वि.का.स. सोसायटी, अंबाई वि.का.स. सोसायटी , हसनसो मुश्रीप वि.का.स. सोसायटी , यांची स्थापना करण्यात आली आहे. या संस्था मार्फत गरजू सभासदांना कर्ज पुरवठा केला जातो. त्यामुळे त्याच्या आर्थिक विकास घडून येण्यास मदत होते.

वाचनालय : कै.कु.सुशीला मगदूम ग्राम वाचनालय भडगाव

गावातील मुला – मुलीना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाची स्थापना केली आहे. वाचनालयामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी हवी असणारी पुस्तके, जनरल नॉलेजची पुस्तके व इतरही मटेरियल (साप्ताहिके,मासिके) उपलब्ध करून दिले जाते.

व्यायामशाळा : व्यायाम शाळा

मुलांना शिक्षणाबरोबरच व्यायामाची हि सवय असावी यासाठी गावामध्ये व्यायाम शाळा काढली आहे. .

गावाचा प्रमुख व्यवसाय हा कृषी, कृषीपुरक जोडधंदे व इतर लहान मोठ्या घरगुती व्यवसायाशी निगडीत आहे. गावातील बागायती कृषी क्षेत्र हे ४०९ हेक्टर इतके आहे.

प्रमुख पिके म्हणून ऊस, भात, नाचना, भुईमूग, सोयाबीन तसेच आधुनिक पद्धतीने फुल शेती व फळ शेती  यांचे उत्पादन घेतले जाते. तर सिंचनासाठी गावाला वेदगंगा नदी व विंधन विहीर  आधार आहे.

गावातील मंदिरे :

गावाचे ग्रामदैवत हनुमान  व अंबाबाई , मरगूबाई  देवी, ही आहेत. हनुमान  व अंबाबाई  यात्रा उत्साहात साजरी केली जाते.