ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :

- तंटामुक्त गाव पुरस्कार.
- निर्मल ग्राम पुरस्कार.
- T B मुक्त ग्रामपंचायत २०२३ कोल्हापूर ग्रामीण.
- ग्रामपंचायतला बाल स्नेही व लिंगभाव अनुकूल पथदर्शी प्रकल्प कागल तालुका अंतर्गत सन २०२२.२३ उत्कृष्ट बालस्नेही ग्रामपंचायत पुरस्कार तालुका स्तरीय तृतीय क्रमांक व उत्कृष्ट महिला सभा ग्रामपंचायत पुरस्कार तालुका स्तरीय तृतीय क्रमांक तसेच T B मुक्त ग्रामपंचायत २०२३ कोल्हापूर ग्रामीण प्राप्त झाले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन…
शुक्रवार दिनांक 20/10/2023 इ रोजी मटकरी मंगल कार्यालय कागल याठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे मा. खासदार संजयदादा मंडलिकसो व मा. नामदार हसनसो मुश्रीफ साहेब पालकमंत्री,कोल्हापूर, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री यांच्या शुभ हस्ते व मा. संतोष पाटील साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. कोल्हापूर, मा. सुषमा देसाई, प्रकल्प संचालकसो, मा. शिल्पा पाटील मॅडम, जि. प. कोल्हापूर, मा. सुशिल संसारे साहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती कागल, मा. अमोल पाटीलसाहेब CDPO पंचायत समिती कागल यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
या पुरस्कारासाठी अनमोल सहकार्य – मार्गदर्शन
मा. सुशिल संसारे साहेब, गटविकास अधिकारी पं. स.कागल, मा. आप्पासाहेब माळी तालुका कृषी अधिकारी, मा. श्री. अमोल मुंडेसाहेब, मा. श्री. दिलीप माळीसाहेब विस्तार अधिकारी, बालस्नेही प्रकल्पाची सर्व टीम,पंचायत समिती कडील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे विशेष आभार…
ग्रामपंचायत भडगाव कडील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका,बचतगट प्रतिनिधी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक-शिक्षिका विद्या मंदिर भडगाव व न्यू इंग्लिश स्कूल भडगाव, बाल सरपंच, उपसरपंच, सर्व बाल पंचायतीचे सदस्य, गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी, तरुण मंडळे, ग्रामस्थ बंधु भगिनी यांचे सर्वांचे शतशः आभार…